दिनांक १ एप्रिल १९५७ रोजी शंकर गणेश घाणेकर ह्यांनी बक्षीसपत्राने आपल्या मालकीची २४२२ चौ. वार जमीन उत्कर्ष मंडळाला देऊन त्याची सर्व कागदपत्रांची पूर्तता करत सशर्त नोंदणी करून दिली.
१९८१- १९८२ – उत्कर्ष मंडळाला – रोटरी च्यारिटरी ट्रस्ट, इंडियन मेडिकल असोसिएशन व घंटाळी मित्र मंडळ सहयोग संस्था म्हणून बरोबर आल्यावर आपल्या संस्थेचे दोन मजली बिल्डिंग बांधून त्यातला तळमजला उत्कर्ष मंडळाचा व वरचे २ मजले त्या संस्था आपल्या समाजसेवी उपक्रमासाठी वापरण्यास सुरुवात झाली.
१८ मार्च १९८८ रोजी तळमजल्याच्या दोन खोल्या व दोन स्वच्छतागृहे व हॉल तयार झाला व त्याचे उदघाटन गुरुवर्य श्री. स. वि . कुलकर्णी ह्यांच्या हस्ते व प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे महापालिकेचे आयुक्त. श्री. सुरेश जोशी उपस्थित होते.
पूर्वीपासून जसा हॉल उपलब्ध होईल त्याप्रमाणे उत्कर्ष मंडळातर्फे बाल वाचनालय ,महिला कल्याण शाखा, बुद्धिबळ प्रशिक्षण वर्ग, नाट्यप्रशिक्षण वर्ग, तबला प्रशिक्षण , लहान मुलांसाठी संस्कार वर्ग, सुगम संगीताचा क्लास असे अनेक उपक्रम चालू होते त्यापैकी बरेचसे आजतागायत चालू आहेत.
उत्कर्ष मंडळाची स्थापना १ जानेवारी १९५३ रोजी श्री. भुबे यांचे घर म्हणजेच मंगेश कुंज, घंटाळी कॉलेज , नौपाडा , ठाणे येथे झाली. जेव्हा नौपाडा विभागात फारसा नागरी सुविधा अस्तित्वात नव्हत्या तसेच नळाद्वारे पाण्याची सोयही नव्हती. तेव्हा त्यावेळच्या ह्या विभागातील खालील प्रतिष्ठित लोकांनी उत्कर्ष मंडळाच्या माध्यमातून सामाजिक क्रांती करण्याचे ठरविले त्यापैकी डॉ. वा. ना. बेडेकर, प्रा. मुकुंदराव आगासकर, र. म. कडुलकर, न. म. आपटे, अ. सि. भुबे, माधवराव तेंडुलकर, एस पी. देशपांडे, जी व्ही वाघ, के एस. लोखंडे , जे. जी . गोगटे , व्ही. जी. ओक, आर व्ही. पत्की , व्ही. के. निमकर इत्यादी.
आम्ही गेले वर्ष येथे ठाण्याचा मध्यवर्ती prime ठिकाणी वसलेले आहोत. ठाण्यासारख्या मध्य मुंबईमध्ये महत्वाच्या शहरात ज्याला भौगोलिक व ऐतिहासिक दृष्ट्या नोंदणीय स्थान आहे. अशा ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांना मार्केट रेटच्या जवळ जवळ ८० ते ९० % स्वस्थ दरात त्याच दर्जाची सेवा देतो.
आमची बहुतांश व्यवस्थापना ( मॅनेजमेंट ) हि स्वयंसेवकांच्या मदतीने चालत आली आहे ठाण्यातील व ठाण्याबाहेरील दिग्गज लोकांच्या सहकार्यानं व सहभागाने हा प्रवास करणे व तुम्हाला माफक दरात सुसज्ज्य जागा उपलब्ध करून आम्हाला शक्य होते.
आपच्या येथे ac बसण्यासाठी खुर्चाची व्यवस्था कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टिम , लिफ्ट , wifi आणि प्रामुख्याने स्वच्छता ( हायजिनिक ऍटमॉस्फेर ) ह्या गोष्टींची उपलब्धता आहे.
राजकीय हेतूसाठी घाणेकर सभागृह भाडे तत्वावर दिले जात नाही. या मागील उद्देश कोणाच्याही भावनांना ठेच पोचवणे नसून , सामाजिक वर्तुळात राजकीय हेतूच्या समावेश टाळणे हा आहे. राजकीय क्लेश सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींनमध्ये न यावेत हा निव्वळ उद्देश आहे.