पैशाच्या अभावामुळे सांस्कृतिक कार्यक्रम करणारे कलाकार पडद्यामागे राहू नयेत हा विचार घेऊन गेली अनेक दशके ही संस्था तत्परतेने कार्यरत आहे.
उत्कर्ष मंडळ ही एक प्रायव्हेट संस्था असून गेल्या १ जानेवारी १९५३ वर्षापासून कार्यरत आहे आजवर अनेक कमिटीने याचा कार्यभार उत्तमरीत्या सांभाळला अनेक अडथळ्यांना मात करत ही संस्था प्रगतिशील पथावर आणून ठेवली या संस्थेने अनेक मान्यवरांचा सुरुवातीच्या काळापासून ते उत्तुंग शिखरापर्यंत जातानाचा प्रवास नोंदवला आहे. तसेच अनेक होतकरू कलाकारांना मंच उपलब्ध करून देण्याचे काम उत्कर्ष मंडळाने उत्तमरीत्या साधले आहे.
पैशाच्या अभावामुळे सांस्कृतिक कार्यक्रम करणारे कलाकार पडद्यामागे राहू नयेत हा विचार घेऊन गेली अनेक दशके ही संस्था तत्परतेने कार्यरत आहे. सहयोग मंदिर ही एक इमारत असून उत्कर्ष मंडळ हे या इमारतीचे मूळ आहे. गेली अनेक दशके उत्कर्ष मंडळालाच ठाणेकर “सहयोग मंदिर” समजत आले आहेत. आजवर याच उत्कर्ष किंवा सहयोग मंदिराचा एक विशिष्ट चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात पिढ्यानपिढ्या त्याच उत्साहाने प्रतिसाद देताना दिसतो.
उत्कर्ष मंडळाने सांस्कृतिक कार्यक्रम जोपासता जोपासता अनेक घरगुती शैक्षणिक, सामाजिक अशा अनेक क्षेत्रांना सहज माफक दरात एक सुसज्ज दालन उपलब्ध करून दिले आहे.
उत्कर्ष मंडळ ठाणे सहयोग सभागृह हॉल सामाजिक विविध सोहळ्यांसाठी कार्यक्रमांसाठी बैठकांसाठी सांस्कृतिक मंच म्हणून भाडेतत्त्वावरती दिला जातो हे सभागृह अगाऊ राखीव करण्यासाठी कार्यालयाची वेळ 9.00 ते 6.00 मध्ये कार्यालयाशी संपर्क साधावा
उत्कर्ष मंडळात उपलब्ध असलेल्या खोल्या या काही छोट्या क्लासेस साठी भाडेतत्त्वावरती दिल्या जातात यातही उद्देश हा सर्वसामान्य माणसाला जागेच्या अभावामुळे अडकाठी होऊ नये हाच आहे ही जागा क्लासेस साठी काही विशिष्ट तास अशा स्वरूपातही दिली जाते
पश्चिम भारताच्या समुद्री व्यापारामध्ये ठाणे अग्रेसर राहण्याचे कारण म्हणजे या जिल्ह्यातील सोपारा, कल्याण व ठाणे ही प्राचीन बंदरे होय. प्राचीन काळापासून या बंदरांतून युरोपमध्ये व्यापार चालत असे. पांडवकालीन शूरक म्हणजेच हल्लीचे ‘सोपारा’ असे म्हटले जाते. सोपारा येथे सम्राट अशोकांचा शिलालेख त स्तूप आहे. या भागावर मौर्य, शिलाहारानंतर तेराव्या शतकात देवगिरीच्या राजा रामदेव याच्या पुत्राची विंब राजाची सत्ता होती. बिंबांच्या कारकिर्दीमध्ये ठाणे शहरामध्ये लष्करी तळ होता. लष्करी तळाला स्थानक असे म्हणत. यावरून या शहराला ‘ठाणे’ हे नाव पडले, असा समज आहे. इ. स. १८०२ मध्ये दुसरा बाजीराव पेशवा व इंग्रज यांच्यामध्ये वसईचा तह झाला. या तहामुळे मराठी सत्ता जवळजवळ संपुष्टात आली.
लहानपणापासून उत्कर्षाला सहयोग समजत आलो पण उत्कर्ष हीच मूळ संस्था आहे व सहयोग मंदिर ही उत्कर्ष मंडळाने बांधलेली वास्तू आहे हे काही दिवसांपूर्वीच मला समजले सहयोग मंदिर उत्कर्ष मंडळ याचा एक स्वतःचा विशिष्ट प्रेक्षक वर्ग आणि रसिक चाहता अशी अनेक विशेषणे लावता येणारा ठाणेकर त्यांनी आपल्या कष्टाने आणि पारदर्शी विचाराने जपला आहे असा प्रेक्षक वर्ग हा मला उत्कर्ष मंडळामुळेच पाहायला मिळाला व उत्कर्ष मंडळासारखी संस्था ठाणेकरांना लाभली हे ठाणेकरांचे भाग्य
केदार जोशी ठाणेकरगाण्याच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी करून लहानपणीची मजा आता घेता येत नाही याची थोडी खंत वाटते परंतु यामागील विचार पाहता की आजूबाजूच्या सदनिकांना कार्यक्रमाच्या आवाजांचा त्रास होऊ नये म्हणून मंडळाने सभागृहामध्ये योग्य ते बदल करून घेतले याचा ठाणेकर म्हणून मंडळाचा अभिमान वाटतो
अभिजित ठाणेकरविशेष म्हणजे इथे सगळी माणसे ही स्वयंसेवक म्हणून ही संस्था सांभाळतात सगळ्यात जबाबदाऱ्या खूप उत्तमरीत्या पार पडतात व असे सुसज्ज मध्यवर्ती ठिकाणी असलेले दालन खूप माफक दरात ठाणेकरांना उपलब्ध करून देतात अशा सर्व जबाबदार स्वयंसेवकांना आणि उत्कर्ष मंडळाच्या पडद्यामागील आधार स्तंभांना माझा मनापासून धन्यवाद
रेवा ठाणेकरठाण्यासारख्या शहरात तेही मध्यवर्ती ठिकाणी व नाही म्हणता येईल अशा दरात उपलब्ध करून समाजातील कलागुणांना आधार देण्यामध्ये मोलाचा वाटा हा उत्कर्ष मंडळ सहयोग मंदिरचा आहे.
स्वाती ठाणेकरआजवर या मंडळाने असंख्य कलाकारांचे पहिले कार्यक्रम कमावले आहेत असंख मोठ्या माणसांना मंच मिळवून देऊन ओळख निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास स्वतःच्या डोळ्यांनी टिपला आहे असे अनेक जण या मंडळाचे मनापासून आभार मानताना मी आजवर बघत आलो.
दुर्गेश ठाणेकर
ठाणे उत्कर्ष मंडळ सहयोग मंदिर हॉल हा मी अनेकदा भाडेतत्त्वावर कथ्थक रियल्सल साठी घेतला आहे अत्यंत माफक दरात हॉल उपलब्ध झाला. त्याचबरोबर मला हॉलची विशेषता स्वच्छता ही आवडते माझ्या सारख्या कलाकारांना कमी करत जागा उपलब्ध करून देण्याचे काम उत्कर्ष मंडळाने केले आहे येथे हॉल भाड्याने दिला जातोच त्याचबरोबर अनेक कला सादरीकरणाचे कार्यक्रम केले जातात त्यामुळे माझ्यासारख्या सर्व युवा कलाकारांना ठाणे उत्कर्ष मंडळाचा सार्थ अभिमान आहे
राधिका कथ्थक नृत्यांगना