Utkarsha Mandal

आपले ठाणे

पश्चिम भारताच्या समुद्री व्यापारामध्ये ठाणे अग्रेसर राहण्याचे कारण म्हणजे या जिल्ह्यातील सोपारा, कल्याण व ठाणे ही प्राचीन बंदरे होय. प्राचीन काळापासून या बंदरांतून युरोपमध्ये व्यापार चालत असे. पांडवकालीन शूरक म्हणजेच हल्लीचे ‘सोपारा’ असे म्हटले जाते. सोपारा येथे सम्राट अशोकांचा शिलालेख त स्तूप आहे. या भागावर मौर्य, शिलाहारानंतर तेराव्या शतकात देवगिरीच्या राजा रामदेव याच्या पुत्राची विंब राजाची सत्ता होती. बिंबांच्या कारकिर्दीमध्ये ठाणे शहरामध्ये लष्करी तळ होता. लष्करी तळाला स्थानक असे म्हणत. यावरून या शहराला ‘ठाणे’ हे नाव पडले, असा समज आहे. इ. स. १८०२ मध्ये दुसरा बाजीराव पेशवा व इंग्रज यांच्यामध्ये वसईचा तह झाला. या तहामुळे मराठी सत्ता जवळजवळ संपुष्टात आली.

ठाणे जिल्हा औद्योगिकदृष्ट्या विकसित असून, या जिल्ह्यात ठाणे, ठाणेवाडी, कळवा, मीरा, वागळे इस्टेट, डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण, कल्याण-भिवंडी रोड, ठाणे-बेलापूर रोड, बदलापूर व शहापूर या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत.
भिवंडी हे ठाणे जिल्ह्यातील कापड उद्योगाचे प्रमुख कद्र आहे. ठाणे-अंबरनाथ-बेलापूर हा औद्योगिकदृष्ट्या देशातील महत्त्वाचा पट्टा मानला जातो. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे रेशमी तयार केले जाते. अंबरनाथ येथे दारूगोळा व शस्त्रनिर्मितीचा भारत सरकारचा उपक्रम आहे.