Utkarsha Mandal

उत्कर्ष मंडळ, ठाणे

उत्कर्ष मंडळ ही एक प्रायव्हेट  संस्था असून  गेल्या १ जानेवारी १९५३  वर्षापासून कार्यरत आहे  आजवर अनेक कमिटीने  याचा कार्यभार  उत्तमरीत्या सांभाळला  अनेक अडथळ्यांना  मात करत ही संस्था प्रगतिशील पथावर आणून ठेवली  या संस्थेने अनेक मान्यवरांचा सुरुवातीच्या काळापासून ते उत्तुंग शिखरापर्यंत जातानाचा प्रवास   नोंदवला आहे. तसेच अनेक होतकरू कलाकारांना  मंच उपलब्ध करून देण्याचे काम  उत्कर्ष मंडळाने उत्तमरीत्या साधले आहे.

 पैशाच्या अभावामुळे सांस्कृतिक कार्यक्रम करणारे कलाकार पडद्यामागे राहू नयेत हा विचार घेऊन गेली अनेक दशके ही संस्था तत्परतेने  कार्यरत आहे. सहयोग मंदिर ही एक इमारत असून उत्कर्ष मंडळ हे या इमारतीचे मूळ आहे. गेली अनेक दशके  उत्कर्ष   मंडळालाच ठाणेकर “सहयोग मंदिर” समजत आले आहेत. आजवर याच उत्कर्ष किंवा सहयोग मंदिराचा एक विशिष्ट चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात पिढ्यानपिढ्या त्याच उत्साहाने प्रतिसाद देताना दिसतो. 

उत्कर्ष मंडळाने सांस्कृतिक कार्यक्रम जोपासता जोपासता अनेक घरगुती शैक्षणिक, सामाजिक अशा अनेक क्षेत्रांना सहज माफक दरात एक सुसज्ज दालन उपलब्ध करून दिले आहे.

 उत्कर्ष मंडळ ठाणे सहयोग सभागृह हॉल सामाजिक विविध  सोहळ्यांसाठी कार्यक्रमांसाठी बैठकांसाठी सांस्कृतिक मंच म्हणून भाडेतत्त्वावरती दिला जातो हे सभागृह अगाऊ  राखीव करण्यासाठी कार्यालयाची वेळ 9.00  ते 6.00  मध्ये कार्यालयाशी संपर्क साधावा

उत्कर्ष मंडळात उपलब्ध असलेल्या  खोल्या  या  काही  छोट्या  क्लासेस साठी  भाडेतत्त्वावरती दिल्या जातात  यातही उद्देश  हा  सर्वसामान्य  माणसाला  जागेच्या अभावामुळे  अडकाठी होऊ नये  हाच आहे   ही जागा    क्लासेस साठी काही  विशिष्ट तास  अशा स्वरूपातही दिली जाते

उत्कर्ष मंडळ स्थापन होण्याचे उद्दिष्ट-

उत्कर्ष मंडळाची स्थापना 1 जानेवारी 1953 रोजी झाली. त्याकाळी परिसरातील एकंदर अडचणींची जाण असल्यामुळे सहकारातून एकोपा जोपासण्यासाठी करमणुकीचे कार्यक्रम व्याख्याने लहान मुलांसाठी बाल वाचनालय तसेच निरनिराळे समाज उपयोगी कार्यक्रम वैद्यकीय मदत व मार्गदर्शन वैद्यकीय साधने घरच्या घरी उपचारांसाठी पुरवणे तसेच परिसरातील नागरिकांना वेगवेगळी उपयुक्त माहिती देऊन त्यांचे हक्क व कर्तव्याची जाणीव करून देऊन नागरि सुविधांमध्ये सुधारणा करणे इत्यादी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून “उत्कर्ष मंडळाची” स्थापना झाली व उत्कर्ष मंडळाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. याच उद्दिष्टांना काळानुसार बदलून पैशाच्या अभावामुळे सांस्कृतिक कार्यक्रम करणारे कलाकार पडद्यामागे राहू नये हा विचार घेऊन आजवर अनेक दशके ही संस्था तत्परतेने आणि विश्वासाने कार्यरत आहे.

गोष्ट घाणेकर उद्यानाची !

दिनांक 1 एप्रिल 1957 रोजी शंकर गणेश घाणेकर यांनी बक्षीस पात्राने आपल्या मालकीची 2422 चौरस वार जमीन उत्कर्ष मंडळाला देऊ केली. त्यावेळी सर्व कागदपत्रांची पूर्तता करत सशक्त नोंदणी करण्यात आली. ठाण्याचा विकास आराखडा तयार होत असताना त्यात सध्याचे ” सहयोग मंदिर पथ ” दर्शवण्यात आले. त्यामुळे मिळालेल्या जागेचे मधून रस्ता जात असल्याने दोन भागात विभाजन झाले मोठ्या भागात बगीच्याचे आरक्षण झाले परंतु लहान भागात इमारत बांधणे शक्य नव्हते म्हणून बरेच प्रयत्न करून ते आरक्षण उठवून लहान जागेवर बगीच्याचे आरक्षण झाले ते आहे सध्याचे ” घाणेकर उद्यान “.
अनेक जुने ठाणेकर रहिवासी आठवणी सांगताना सहज सांगतात की त्याकाळी त्या परिसरात प्रचंड अडचणी होत्या त्या जागेवर तळ होत परंतु उत्कर्ष मंडळाची इमारत आणि घाणेकर उद्यान यामुळे त्या परिसराला शोभा आली. लोक कार्यक्रमाच्या निमित्ताने बैठकीमुळे व्याख्यानांमुळे इत्यादी अनेक कारणांमुळे लोक त्या परिसरात जाऊ लागले अनेक ठाणेकर बालपणीची आठवण सांगताना सहज बोलून जातात की आमची शाळेची पिकनिक घाणेकर उद्यानात जायची त्या उद्यानात घोड्याची रपेट मारलेली आठवते.
आत्ताच्या काळात ठाणे महानगरपालिकेच्या सहयोगाने उद्यानाचे वेगळे रूप दिसून येते त्यात आता एक्सरसाइज ऍक्टिव्हिटीज लहान मुलांसाठी झोपाळा घसरगुंडी इत्यादी अनेक गोष्टी आढळतात असेच येथे 2010 मध्ये ठाणे महानगरपालिका कला माध्यमाकडून विद्यमान स्व ओ पी नय्यर यांचे स्मृतीचिन्ह देखील साकारले आहे.

सहयोग मंदिर इमारतीची रचना

उत्कर्ष मंडळाला प्राप्त निधीतून इमारत बांधणे कठीण होते म्हणून समविचारी समस्येने अशा संस्थांना बरोबर घेण्याबाबत विचार करण्यात आला या विचारानुसार अनेक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका झाल्या व अखेरीस दोन संस्थांची उत्कर्ष मंडळाची नाळ जोडली गेली पदाधिकाऱ्यांची बैठक झाली व इमारतीच्या बांधणीचा निर्णय पक्का झाला त्यानंतर इमारतीचे नाव ठरवले “ सहयोग मंदिर ” या इमारतीची रचना ही पहिला मजला उत्कर्ष मंडळ ठाणे घाणेकर सभागृह व कार्यालय दुसरा मजला इंडियन मेडिकल असोसिएशन रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट व तिसरा मजला घंटाळी मित्र मंडळ श्री पांचाळ समाज मध्यवर्ती मंडळ अशी आहे